
सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा ,सार्वत्रिक मान्यतेसाठी तयार असतात जेव्हा त्या सर्व डोमेन आणि इमेल नावे स्वीकारण्यास, प्रमाणित करण्यास, संग्रहित करण्यास, प्रक्रिया करण्यास आणि प्रदर्शित करण्यास सक्षम असतात.
यामध्ये समाविष्ट आहे :
- नवीन शीर्षस्तरीय डोमेन नावे
- आईडीएन डोमेन नाव
- मोठी शीर्षस्तरीय डोमेन नावे
- युनिकोडमधील पत्रपेटीची (mailbox) नावे
तुमची प्रणालीला यूए वापरण्यास तयार करण्यासाठी, खाली दिलेल्या गोष्टी कराव्यात :
- इनपुट प्रमाणित करा: तुमची प्रणाली सर्व वैध डोमेन नावे, ईमेल पत्ते आणि इतर महाजालवरील ओळखकर्त्यांची पडताळणी वा प्रक्रिया करते का नाही ह्याला सुनिश्चित करा. यात ओळखकर्त्यांचा सिन्टेक्स (syntax) आणि रचना पडताळणे आणि ते वैध स्वरूपात आहेत की नाही हे देखील तपासणे येते.
- युनिकोड समर्थित: युनिकोड एक सार्वत्रिक वर्ण एन्कोडिंगचे मानक आहे जो सध्या वापरात असलेल्या जवळजवळ सर्व लिपी आणि भाषांचे प्रतिनिधित्व करू शकतो. तुमची प्रणाली युनिकोडला समर्थन देते याची खात्री करा, जेणेकरून ती कोणत्याही लिपी किंवा भाषेत महाजालावरील ओळखकर्त्यांवर प्रक्रिया करू शकेल.
- अंतरराष्ट्रीय डोमेन नावे (आयडीएन) वापरा (आयडीएन):: आयडीएन ही ती डोमेन नावे आहेत ज्यात हिंदी, मराठी किंवा बंगाली अक्षरांसारख्या आस्की नसलेल्या अक्षरांचा वापर करता येतो. तुमची प्रणाली आयडीएनला वापरू देते याची खात्री करा, जेणेकरून वापरेकरू त्यांच्या स्वत:च्या भाषेत डोमेन नावाची नोंदणी करू शकेल.
- युएनी दिलेल्या उदाहरणांवर तपासून पहा: तुमची प्रणाली सर्व भाषा आणि लिपीमध्ये महाजालावरील ओळखकर्ते स्वीकारू शकते आणि त्यावर प्रक्रिया करू शकते ह्याची खात्री करण्यासाठी युएनी दिलेल्या तपासणी उदाहरणांवर तुमच्या प्रणालीची चाचणी घ्या. ह्यासाठी असे अनेक यूएच्या चाचणीसाठीची उदाहरणे उपलब्ध आहेत जी तुम्हाला यूए तयारीसाठी कोणतीही अडचण किंवा कमतरता ओळखण्यात मदत करू शकतील.
- सर्वोत्तम पद्धतींचा वापर करा: इंटरनेट अभियांत्रिकी टास्क फोर्स (आयईटीएफ) बेस्ट करंट प्रॅक्टिस (बीसीपी) १८ आणि बीसीपी ४७ मध्ये नमूद केलेल्या यूए तयारीसाठी सर्वोत्तम पद्धतींचे अनुसरण करा. आंतरजाल तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंमध्ये आंतरराष्ट्रीयीकरणाला समर्थन कसे द्यावे ह्याबद्दल हे दस्तऐवज मार्गदर्शन करते.